आदिशक्ती दुर्गेच्या दरबारात विठू माऊलीचा गजर

0
206

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी

दि.३० सप्टेंबर २०२२

आदिशक्ती दुर्गेच्या दरबारात विठू माऊलीचा गजर
पाचोरा येथे मानसिंगका मिलच्या प्रांगणात सुरू असलेल्या जागर शक्तीचा- उत्सव भक्तीचा जल्लोष २०२२ गरबा दांडिया रास मध्ये गुरुवारी रात्री वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा गजर करत खऱ्या अर्थाने शक्ती व भक्तीचा जल्लोष केला.
आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील आयोजित व आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर व एम एस पी बिल्डकॉम चे संचालक मनोज भैय्या पाटील प्रायोजित जल्लोष २०२२ गरबा दांडिया रासला आदिशक्ती देवीचा जयघोष व आरतीने प्रारंभ झाला’ सुमित दादा पाटील, मुकुंद बिल्दीकर, मनोज पाटील, संजय गोहिल ,आदित्य बिल्दीकर, शरद पाटे, सुनिता ताई पाटील, मयुरी ताई बिल्दीकर, मंदाताई पाटील, वर्षाताई पाटील, जितेंद्र पेंढारकर ,संदीप महाजन, भूषण पेंढारकर, राहुल पाटील, जितेंद्र काळे ,धनराज पाटील ,केदार पाटील,प्रा डॉ वैष्णवी महाजन, शितल महाजन, प्रीती बोथरा, उर्वशी मोर, दुष्यंत खंडेलवाल, मालवीन सालोमन, आमदार किशोर पाटील यांचे पीए राजेश पाटील, आनंद पगारे, समाधान पाटील, मनोज बडगुजर यांचेसह उपस्थित भाविकांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर दांडिया गरबा रास रंगली. तीन स्वतंत्र राउंड घेण्यात आले. लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे ह भ प योगेश महाराज व सुनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट, पॅन्ट व टोपी परिधान करून भगवा ध्वज उंचावत विठू माऊलीचा गजर केला. बाल वारकऱ्यांचे नृत्य व विविध प्रकारच्या उड्या पाहून उपस्थित सारेच भारवले. त्यामुळे आदिशक्ती दुर्गा मातेसह विठू माऊलींचा जयघोष उपस्थितांनी केला. मॅचिंग पेहराव केलेल्या महिलांना ड्रॉ काढून त्यांना पैठणी देण्यात आली ४ तसेच आमदार किशोर आप्पा पाटील ,मुकुंद बिल्दीकर ,मनोज पाटील यांच्या विकास कामांवर आधारित प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. मोहित चौधरी, शुभम खैरनार ,स्नेहा प्रजापत, करण बागुल, ललिता पाटील, सुलोचना मोरे, मंगल ठाकूर ,दीपक महालपुरे हे पैठणी व बक्षिसाचे मानकरी ठरले. नाशिक येथील अमोल पालेकर यांच्या सुर व संगीताची मैफिल उपस्थितांना ठेका घेण्यास भाग पाडणारी ठरली. तसेच दोंडाईचा येथील संतोष ठाकूर यांच्या उजाला डिजिटल साऊंडने धमाल उडवली,परीक्षक म्हणून प्रीती बोथरा, शितल महाजन ,उर्वशी मोर, दुष्यंत खंडेलवाल, मालवीन सालोमन यांनी जबाबदारी पार पाडली. ग्रीन ॲपल इव्हेंटचे संदीप महाजन यांनी गरबा व दांडिया संदर्भातील नियमावली समजावून सांगत सुयोग्य नियोजन व धावते वर्णन केले. संदीप महाजन, राहुल पाटील ,जितेंद्र काळे, सागर शेख ,भूषण पेंढारकर ,धनराज पाटील यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सुयोग्य नियोजन करून परिश्रम घेतले .उपस्थितांची स्पर्धकांना चांगलाच प्रतिसाद दिला. उपस्थित प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व घोषणांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला.