आरोग्य विभागाकडून पाचोरा शहरात महिलांची मोफत आरोग्य तपासणी अभियान

0
234

नवरात्र उत्सव २०२२ निमित्त महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून पाचोरा शहरात महिलांची मोफत आरोग्य तपासणी अभियान
शहरातील रंगार गल्ली येथे “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात “नवरात्र उत्सव – २०२२” निमित्त माता, भगिनींची मोफत आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि. ३० सप्टेंबर रोजी शहरातील रंगार गल्ली भागात पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व डॉ.अर्चना पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर माता व १८ वर्षांवरील महिला, युवक, युवतींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात आरोग्य डॉ. संपदा पाटील, सेविका वनिता जाधव, जिजाबाई वाडेकर, आशा वर्कर वृषाली येवले, रंजना मोरे, संगिता पाटील, लॅब टेक्निशियन भरत चौधरी, साहिल शेख, सलमान मणियार, उज्वला पाटील या टीमने परिसरातील महिला, गरोदर माता, १८ वर्षांवरील युवक, युवती यांचे वजन, उंची, रक्तगट, हिमोग्लोबिन, सह आरोग्य तपासणी करुन त्यांना कॅल्शियम युक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ही योजना दि. ५ ऑक्टोंबर पर्यंत राबविण्यात येणार असुन योजनेस तमाम माता भगिनी, युवक व युवतींनी लाभ घेवून सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी केले आहे.