उद्या पाचोरा येथे तहसील कार्यलयासमोर शिवसेनेकडून एकदिवसीय धरणे आंदोलन

0
310

पाचोरा

केंद्र सरकारने नुकतेच देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात 3 कायदे आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केले आहेत . सदरच्या मंजूर केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार असून अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भरडून निघणार आहे . या कायद्यांना केंद्र सरकारने मागे घ्यावे, यासाठी दिल्लीजवळ देशभरातील शेतकरी संघटना व शेतकरी एकवटून गेले आहेत. गेल्या आठ दिवसापासून शेतकरी व शेतकरी संघटना दिल्ली येथे आंदोलन करत आहे . याचा निषेध म्हणून पाचोरा येथे उद्या दिनांक 3/12/2020 रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा तालुका शिवसेना ,युवासेना महिला आघाडी, व शेतकरी सेना तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत .