मा. आमदार ओंकार वाघ यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त श्री.गो.से. हायस्कूल येथे विविध स्पर्धांचे आयोजन..

0
204

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
२० ऑगस्ट २०२२
मा. आमदार ओंकार वाघ यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त श्री.गो.से. हायस्कूल येथे विविध स्पर्धांचे आयोजन..
पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या ठिकाणी माजी आमदार लोकनेते ओंकार वाघ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ही करण्यात आला तांत्रिक विभाग चेअरमन . वासु महाजन, मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रंगभरण चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, कराटे प्रात्यक्षिक, स्लो सायकलींग, गीत गायन अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले .बक्षीस वितरण प्रसंगी उप मुख्याध्यापक एन. आर .ठाकरे. पर्यवेक्षक आर. एल. पाटील , ए बी. अहिरे. अजय सिनकर, टेक्निकल विभाग प्रमुख एस. एन. पाटील,एम बी बाविस्कर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.