पाचोरा भाजपा उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सचिन संचेती व शहराध्यक्षपदी मुन्ना अग्रवाल यांची नियुक्ती

0
232

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
२० ऑगस्ट २०२२

पाचोरा भाजपा उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सचिन संचेती व शहराध्यक्षपदी मुन्ना अग्रवाल यांची नियुक्ती

पाचोरा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या असून भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या आदेशाने उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल व तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सुशील डेअरीचे संचालक सचिन संचेती व शहराध्यक्षपदी रोडीलाल छगनलाल अग्रवाल अन्नधान्य प्रोसेसिंग कंपनीचे संचालक तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष सिताराम उर्फ मुन्ना अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे उद्योजक व व्यापारीवर्गासह सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत असुन आगामी काळात पाचोर्‍यातील उद्योग क्षेत्रात उद्योजकांसह कर्मचारी कामगारांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच पाचोरा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी नव-नवीन उद्योगांना कशा पद्धतीने चालना देता येईल यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी सतत प्रयत्नशील राहील असे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन संचेती व शहराध्यक्ष मुन्ना अग्रवाल यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पान-पाटील उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन शहराध्यक्ष रमेश वाणी सरचिटणीस गोविंद शेलार दीपक माने भावेश चौधरी भैय्या ठाकूर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.