पाचोरा गुर्जरसमाजा तर्फे स. वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

0
121

पाचोरा गुर्जरसमाजा तर्फे स. वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

पाचोरा – परिसर गुर्जर समाजातील सर्व पोटजाती रेवे,लेवा,दोडे, सुर्यवंशी, बडगुजर, गुर्जर यासर्व समाज बांधवांची बैठक पाचोरा शहरातील पुनगावरोड वरील ध्येय करिअर अँकेडमीच्या दालनात संपन्न झाली
सदर बैठकीत समाजातील वरिष्ठ मान्यवर, युवावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता यावेळी गुर्जरसमाज भुषण लोहपुरुष सरदार वल्ताभभाई पटेल यांची जयंती निमित्त
“गुर्जर संघटन काळाची गरज” या विषयावर पाचोरा परिसर मर्यादित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन स्पर्धकांनी आपला निबंध २५० शब्दात फुल स्क्वेफ कागदावर एका बाजुने लिहून दि. २९ ऑक्टो. शनिवारी दु.१२-०० पावेतो हाय- टेक- कॉम्पुटर किंवा शिव एम्पोरिम येथे जमा करावेत यात प्रथम तिन विजयी स्पर्धकांना सदर निबंधाचे वाचन करावं लागणार आहे. तर दि.३० ऑक्टोबर रविवार रोजी स.९-३० वाजता वर्ग KG ते ८ मधिल विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी “मोबा-TV याचे परिणाम” & वर्ग ९ ते पदवी पर्यत विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी “माझे ध्येय त्यासाठी अपेक्षा” या विषयावर प्रत्येकी सात मिनीट असलेली वत्कृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
यास्पर्धेत विजयी स्पर्धकांचा बक्षिस समारंभ व सर्व कार्यक्रम दि.३१ ऑक्टो. सोमवार रोजी सकाळी ९ – ३० वाजता पाचोरा शहरातील ध्येय करिअर अँकेडमीतील स्वातंत्र्य सैनीक कै.आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात संपन्न होणार आहे. यामध्ये “मी माझा व्यवसाय व अनुभव” यावर देखील अनुभवी व्यक्ती मनोगत व्यक्त करणार आहेत तरी पाचोरा शहर व परिसरातील गुर्जर समाज तथा पोटजाती मधील सर्व बालके, युवावर्ग सह बंधु-भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.