पाचोरा बंद साठी कॉंग्रेस मैदानात

0
271

पाचोरा बंद साठी कॉंग्रेस मैदानात
पाचोरा – महाराष्ट्रात सद्यस्थितीत भाजपा वाचाळविरांच्या विरोधात निषेधार्थ म्हणून दि. १४ रोजी पाचोरा बंद ची हाक दिली
महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरात जात आहे त्यामुळे बेरोजगारी मध्ये भर पडत आहे त्याच बरोबर महागाई दिवसेंदिवस वाढत आहे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत जनतेचेऊ मुळविषावर लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा-शिंदेसेना
छत्रपती शिवाजी महाराज, म. ज्योतीबा फुले,  सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर  अकलेचे तारे तोडत बोलत आहेत  भाजपा च्या या वाचाळविरांचे तोंड बंद करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सनधशीर मार्गाने  आंदोलन सुरू केले आहे. पाचोरा शहर बंद ची हाक कॉंग्रेस ने दिली असून दि. १४ रोजी पाचोरा शहरातील आणि तालुक्यातील व्यापारी बंधु यांनी सहकार्य करत पाचोरा बंद मध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येवुन पाचोरा शहर व तालुका काँग्रेस चे पदाधिकारी यांनी दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवुन व्यापारी बंधु यांना बंद चे शांततेचे आवाहन करावे असे आवाहन तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.