ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेनं भूसावल देवळाली / इगतपुरी passenger तात्काळ सुरू करण्यात यावी अशी विनंती केली

0
316

भुसावळ देवळाली/इगतपुरी पॅसेंजर तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस क्रमांक 01039/40 च्या वेळेत 1 डिसेंबर 2020 पासून बदल करून एक तास अगोदर करण्यात आल्याने भुसावळ विभागातील चाकरमानी व प्रवाशी वर्गाची गैरसोय रेल्वे बोर्डा कडून करण्यात आली आहे, कोरोना काळ सहन करतानाच त्यात आता कुठे तरी नुकतीच ट्रेन सुरू झाली व आता पोटाची खळगी भरण्यासाठीची चांगली वेळ येईल असे शहरी व ग्रामीण जनतेला दिसत असतानांच रेल्वे बोर्डाने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे, यामुळे ग्रामीण जनतेला आता सकाळी अगदी लवकरच घराबाहेर पडावे लागून अधिकचा त्रास सहन करावा लागणार आहे, त्यात रोजचेच तिकीट reservation करावे लागत असल्याने समस्येत भर पडतच असतांना हा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी विनंती ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेतर्फे मा. खासदार साहेब जळगांव, डी आर एम विभाग भुसावळ, मुंबई जनसंपर्क कार्यालय व दिल्ली बोर्डाकडे ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.