दुसखेडा येथे भरदिवसा वृद्धास चाकुचा धाक दाखवत दरोडा

0
688

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि,३० डिसेंबर २०२२
दुसखेडा येथे भरदिवसा वृद्धास चाकुचा धाक दाखवत दरोडा
– ८७ वर्षाच्या वृद्धाचे हातपाय बांधून सुमारे ३ तोळे सोने व ५ लाख रुपये रोख चोरट्यांने लांबविले
पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथे गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या इसमाने घरात घुसून घरात असलेल्या ८७ वर्षाच्या वृद्धास चाकुचा धाक दाखवत हातपाय बांधून त्यास जीवे मारण्याची धमकी देत कापाटातील सुमारे ३ तोळे सोने व ५ लाख रुपये रोख लांबविल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सह पाचोरा येथील पोलीसांची तुकडीने पंचनामा करुन चोरट्याचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉट व फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.
पाचोरा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसखेडा गावी रविंद्र एकनाथ पाटील यांचे ८७ वर्षाचे वडील एकनाथ पांडू पाटील हे ऐकटे घरी असतांना दुपारी एक वाजेच्या दरम्यान ३० ते ३५ वर्षाचा पुरुष तोंडाला रुमाल, चष्मा, हातात हात मोजे परिधान केलेल्या अवस्थेत घरात घुसला व घरातील एकट्या असलेल्या ८७ वर्षाच्या एकनाथ पाटील या वृद्धास चाकुचा धाक दाखवून मागच्या खोलीत नेले. व त्याठिकाणी एकनाथ पाटील यांच्या तोंडाला रुमाल बांधत हात, पाय देखील बांधत जीवे मारण्याची धमकी देऊन पलंगावर धकलुन दिले. व कपाटातील सुमारे ५ लाख रुपये रोख व ३ तोळे सोने घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. सद्यस्थितीत शेतीचे कामे सुरू असल्याने रविंद्र पाटील व त्याचा मुलगा शेतात गेला होता तर त्याची पत्नी व सुन गावात पापड लाटण्यासाठी गेली असतांना दुपारी एक वाजता घरी कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने भरदिवसा दरोडा टाकला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, बीट हवालदार मुकुंद परदेशी, पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील, निलेश गायकवाड सह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करत घटनाक्रम जाणुन घेतला. यावेळी जळगांव येथील फिंगरप्रिंट तज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान डाॅग स्टाॅड मधील डाॅग ने घरापासुन काही अंतरा पर्यंतच मागोवा दाखविला. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
नातुच्या विवाहासाठी जमा केले होते पैसे व दागिने
दुसखेडा ता. पाचोरा येथील रवींद्र एकनाथ पाटील यांच्या मुलगा याचा सोयरीक संबंध तालुक्यातील पहाण येथील झालेला असल्याने काही दिवसात साखरपुडा करून विवाह लावण्यात येणार होता विवाहासाठी अनेक वर्षांपासून पैसे व सोने घरात साचवून ठेवले होते मात्र अज्ञात चोरट्याने अनेक वर्षांपासून जमा केलेली माया पुंजी लंपास केल्याने घरातील सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.