गो. से. हायस्कूलचा “वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन विचारवंत जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते संपन्न

0
153

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी ९७६६२४४५८६
श्री. गो. से. हायस्कूलचा “वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन विचारवंत जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते संपन्न
पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये आज दि. २ जानेवारी व ३ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन – २०२२ – २०२३ नव्या वर्षाचे स्वागत करु या व “जुन्या स्वप्नांना पुन्हा नव्याने फुलवु या” चे आयोजन करण्यात आले असुन या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आज दि. २ जानेवारी रोजी धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या समारंभाचे अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन खलिल देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला मधुकर वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, दिशा डेंन्टल क्लिनिकचे संचालक डॉ. अमोल जाधव, दर्शन फॅशनचे ओम राठी, युनिक काॅम्प्युटरचे स्वप्निल ठाकरे, आशिर्वाद काॅम्प्युटरचे संचालक अतुल शिरसमणे, शितल अॅकेडमीचे रोहन पाटील, पंडित अभिमनशेठ, सराफ ज्वेलर्सचे जगदिश सोनार, वाघ डेअरीचे संचालक अश्विन वाघ, ओम हाॅस्पिटलचे संचालक डॉ. अजयसिंग परदेशी, थेपडे बिल्डर्सचे संचालक अपुर्व थेपडे, ओमलक्ष्मी सिराॅमिकचे संचालक सुरज वाघ, गजानन डेअरीचे संचालक योगेश पाटील हे उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला मधुकर वाघ यांनी केले. सुत्रसंचालन अंजली गोहिल, वैशाली कुमावत, सुखदा पाटील यांनी केले. या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिस वितरण व समारोप अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गीतगायन, सामुहिक नृत्य, नाट्यछटा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या स्नेहसंमेलना प्रसंगी शाळेच्या आवारात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी भेळ, चाॅकलेट, पाणी पुरी, कचोरी अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच आज ३ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत अल्पोपहार, सांस्कृतिक कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस, गीतगायन, सामुहिक नृत्य, बालनाट्य व तदनंतर स्नेहसंमेलनाचा समारोप व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दोन दिवशीय स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी श्री. गो. से. हायस्कूलचे सर्व पर्यवेक्षक, हायस्कूलचे तांत्रिक विभाग, किमान कौशल्य विभाग, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी अथक हे परिश्रम घेत आहे.