राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप वाघ .

0
86

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी

दि, २३ जानेवारी २०२३

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप वाघ .

पाचोरा खडकदेवळा खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा समारोप दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:०० वाजता पार पडला दिनांक १७ ते २३ जानेवारी २०२३ या दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विद्यापीठ दर वर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देते व विद्यार्थ्यांच्या आदर्श नागरिकाचे गुण रुजविते असे प्रतिपाद दिलीप वाघ यांनी केले यावेळी विद्यार्थी स्वयंसेवक झोया काझी, निखिल पाटील,लहू मोरे,अश्विनी पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.७ दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता अभियान,मतदार जनजागृती,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त अभियान या विषयी जनजागृती केली तसेच या सात दिवसात अनेक विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खलील देशमुख यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील,उपप्राचार्य डॉ वासुदेव वले,उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील, बारकूदादा पाटील,कपूरचंद तेली,रामचंद्र शेलार, गावातील पोलीस पाटील तुकाराम तेली,गजानन तेली,जितेंद्र पाटील,प्रो. जे डी गोपाळ,प्रा एस बी तडवी,प्रा.डॉ माणिक पाटील,वाय बी पुरी,प्रा.डॉ प्राजक्ता शितोळे,प्रा.जागृती मोरानकर आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश वळवी यांनी प्रास्ताविक केले,सूत्रसंचालन प्रा.डॉ के एस इंगळे यांनी केले तर आभार प्रा स्वप्नील भोसले यांनी मानले.