पाचोरा -भडगाव पदवीधर निवडणूकीसाठी महाविकास आघाडी मैदानात

0
606

पाचोरा -भडगाव पदवीधर निवडणूकीसाठी महाविकास आघाडी मैदानात
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज ३०/०१/२०२३ रोजी झाली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात अपक्ष उमेदवार असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शुभांगी भास्कर पाटील या निवडणुकीच्या आखाड्यात काट्याची लढत देत आहे पाचोरा शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभांगी ताई पाटील यांना निवडून आणण्या साठी कंबर कसली आहे.आज दिनांक ३० रोजी पाचोरा शहरातील गो से हायस्कूल बुथ वर महाविकास आघाडीचे पदाधिकारी शुभांगी पाटील यांना मतदान करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय इंदिरा काँग्रेस,या पक्षाच्या पदाधिकारी सकाळ पासून बुथवर ठाण मांडून बसलेले आहेत यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी,शहर अध्यक्ष अमजद पठाण जिल्हा पदाधिकारी अविनाश भालेराव ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मणियार सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,राहुल शिंदे अमझद खान,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका तालुकाप्रमुख शरद पाटील उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, अनिल सावंत,अभिषेक खंडेलवाल,भूपेश सोमवंशी, अजय पाटील,पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, क्षत्रिय ग्रुपचे धनराज पाटील, बाबाजी ठाकरे वैभव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे पी डी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील,अभिलाषा रोकडे, गोपी पाटील, अझर खान, संजय पाटील, धनंजय पाटील, प्रशांत नैनाव, आदी उपस्थितीत होते महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मतदान करण्याचे आव्हान सर्व पदाधिकारी करीत आहे.