सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पाचोरा तालुक्यातील सारोळा येथुन

0
663

आरोग्यदूत न्यूज चैनल
राईस बागवान शहर प्रतिनिधी
दि, १३ फेब्रुवारी २०२३
शनीधाम येथे बैल गाडी शर्यतीचे भव्य उद्घाटन : अनेक बैलगाडींचा समावेश
पाचोरा (प्रतिनिधी) –
पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील शनिधाम परीसरात बैल गाडी शर्यतीचे
ग्रामीण भागातील सर्वात आवडता खेळ बैलगाडी शर्यतीचा आहे. या खेळाचे भव्य आयोजन पिर बाबा यात्रे निमित्ताने वाघुलखेडा येथील राजे मित्र मंडळ सह परीसरातील शेतकरी मित्रांनी केले होते. या शर्यतीचे उद्घाटन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते आणि शनीधाम चे प्रमुख ह. भ. प. भरत महाराज, सरपंच दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजक गणेश पाटील, नाना पाटील, कीशोर पाटील, संदीप भदाणे, प्रमोद पाटील, हरी पाटील, समाधान पाटील, बंटी पाटील, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे उपस्थितीत होते यावेळी सोयगाव, सिल्लोड, नांदगाव सह परीसरातील जवळपास ४० हुन अधिक बैलगाडींचा समावेश होता.