पाचोऱ्यात १२ वी च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या

0
1477

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १ मार्च २०२३

पाचोऱ्यात १२ वी च्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या
पाचोरा, प्रतिनिधी !
शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात १२ वीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागातील रहिवासी राजदत्ता नरेंद्र पवार (वय – १८) हा इयत्ता १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत होता. नुकतीच सर्वत्र १२ वीची परीक्षा सुरू आहे. राजदत्ता पवार याने वडगाव ता. सोयगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेवुन १२ वी ची परीक्षा देत होता. २७ फेब्रुवारी रोजी फिजिक्सचा पेपर राजदत्ता याने दिला होता. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता हा घरीच होता. सायंकाळी ५ वाजता राजदत्ता याने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ता यांचे मित्र ५ वाजेच्या सुमारास राजदत्ता याचे घरी आले असता राजदत्ता हा घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला असता राजदत्ता पवार हा घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आल्याने मित्रांनी एकच आक्रोश केला. राजदत्ता याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत