Breaking news pachora अजब प्रकार सरकारी केंद्रातून शेतकऱ्याचे कापसाने भरलेले वाहन पळविले

0
637

आरोग्यदूत न्यूज चॅनेल
पाचोरा Breaking
अजब प्रकार सरकारी केंद्रातून शेतकऱ्याचे कापसाने भरलेले वाहन पळविले
दि,7 डिसेंम्बर 2020 पाचोरा जवळील गिरड रस्त्यावरील गजानन जिनिंग येथे सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू आहे, त्यात कापूस खरेदीकरणाऱ्यांकडून संबंधित आलेल्या सर्वच वाहनांमधील कापूस खरेदी करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येऊन आंदोलने, चर्चा नंतर, व नाट्य घडले त्यात तोडगा म्हणून सर्वच वाहनांचे पंचनामे करण्यात आले, व तरीही कापूस खरेदी करण्यात टाळाटाळ करण्यात आली, शेतकरी मित्राला नाहक त्रास होईल अशी वागणूक देत 8 दिवसांपासून सर्वच वाहन जिनिंग बाहेर उभ्या करण्यात आल्या, त्यातच लाईन मध्ये उभे असलेली वाहन सफेद छोटा हत्ती गिरड येथील शेतकरी संदीप आबा पाटील यांच्या मालकीचा कापसाने पूर्ण भरलेली होते, सरकारी खरेदी केंद्रात विक्री साठी आणलेली असतांना गाडी 6 दिवसांपासून जिनिंग बाहेर उभी ठेवण्यात आली व रात्री उशिरा नंतर ती अचानक गायब झाली, पळविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोदाशोध सुरू असतांना गाडीचा कुठेही तपास नसल्याने संबंधित शेतकऱ्याने पाचोरा पोलीस स्टेशन कडे धाव घेत आपली व्यथा मांडत तक्रार नोंदवत असल्याचे खुद्द संदीप पाटील यांनी आरोग्यदूत न्यूज चॅनेल ला सांगितले, लोकनेत्यांनी शेतकरी अशा समस्येकडे लक्ष घालावे असे वाहन कुठेही दिसल्यास तात्काळ तक्रार कर्त्याशी संपर्क साधावा – 9730660263