केंद्र सरकारने शेतकर्यांच्या विरोधात ३ कायदे लागू केले . ते शेतकार्यांना अमान्य असल्यामुळे त्यांनी गेल्या १५ दिवसांपसून दिल्ली येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. परंतु त्याला अजून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज दिनांक ८/१२/२०२० रोजी शेतकर्यांनी भारत बंदचे आव्हान केले आहे. या देशव्यापी भारत बंदला देशातील अनेक ठिकाणाहून भरगोस प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशव्यापी भारत बंदला खांदेशातील भडगाव येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत . या भारत बंदच्या आव्हानात शेतकरीच नव्हे तर, व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात सामील झाले. सर्वच पक्ष व राजकीय संघटना या आव्हानात सहभागी होताना दिसून आले . शेतकर्यांसाठी काय फायद्याच होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .