गोंदेगाव येथे शेतकर्‍यांच्या भारत बंदला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसला नाही

0
519

गोंदेगाव ता. सोयगाव

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या विरोधात ३ कायदे लागू केले . ते शेतकार्‍यांना अमान्य असल्यामुळे त्यांनी गेल्या १५ दिवसांपसून दिल्ली येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. परंतु त्याला अजून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज दिनांक ८/१२/२०२० रोजी शेतकर्‍यांनी भारत बंदचे आव्हान केले आहे. या देशव्यापी भारत बंदला देशातील अनेक ठिकाणाहून भरगोस प्रतिसाद मिळाला.  केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशव्यापी भारत बंदला मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला  दिसून आला नाही . अत्यावश्यक सेवेबरोबर सर्वच दुकाने ,व्यवसाय तसेच साप्ताहिक बाजारपेठ देखील भरवण्यात आली . गोंदेगाव मधील कुठलाही पक्ष अथवा कोणतीही संघटना या भारत बंद मध्ये सहभागी झाली नाही. गोंदेगाव मध्ये शेतकरी वर्गासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नसल्याचे दिसून आले .