पाचोरा शहर व ग्रामीण भागातील कुष्टरोग बाबत सविस्तर माहिती..

0
622

नरसिंग भुरे. (पाचोरा )

राज्यशासना मार्फत संपूर्ण राज्यात व जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामीण भागात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत कुष्टरोग सर्वे राबविला जात आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील कुष्टरोग तंत्रज्ञ एकनाथ डी पाटील यांनी आपल्या आरोग्यदूत न्यूज मार्फत कुष्ठरोग सर्वे बाबत जनतेला खालील प्रमाणे माहिती दिली आहे.

पाचोरा शहर व ग्रामीण भागात एकूण २१३ आशास्वंसेवक व पुरुष स्वयंसेवकांचा गट आहे. पाचोरा शहरी भागात एकूण १० गट व पाचोरा ग्रामीण भागात एकूण २०३ गट तयार करण्यात आले आहे.

पाचोरा शहर व ग्रामीण भागात एकूण १७३ संशयित आढळून आले आहेत. त्या पैकी ग्रामीण भागात एकूण १६३ संशयित आढळून आले आहेत. शहरी भागात ३ रुग्ण आढळून आले आहेत त्यांना निदान दिल्या नंतर त्यांच्या वर उपचार सुरू करण्यात आला आहे. अजून सर्वे सुरू आहे १६ डिसेंबर पर्यंत जे संशयित रुग्ण आढळतील त्यांच्यावर पूर्ण उपचार करण्यात येईल.

कुष्टरोगाचे विशेष लक्षणे – रुग्ण उन्हात गेला की त्याची त्वचा तेलगट व चकाकते किंव्हा लालसर चट्टे येतात. जे संसर्ग जन्य रुग्ण असतात त्यांच्या कानाच्या पाडया जाड झाल्या असतात

प्रत्येक संशयित रूग्णाचा मोफत उपचार आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय , आणि  नगरपालिका रुग्णालय येथे करण्यात येईल.