जळगाव जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’

0
699

राज्यात फेब्रुवारी अखेरपासून कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वत्र रस्तेवाहतुक बंद होती. परिणामी सर्व सामान्यांना रुग्णालया पर्यंत जाण्यासाठी तत्काळ सेवेसाठी प्रसिद्ध 108 रुग्णवाहिकेने लक्षवेधी काम केल्याने ही सेवा राज्य भरातील तब्बल 4,50,000 कोरोंना रुग्णांसाठी जीवनदायी ठरली. मार्च ते नोव्हेंबर 2020 पर्यन्त 937 रुग्णवाहिकांनी राज्यभरातील लाखो रुग्णांना उपचारार्थ वेळेत रुग्णालयात पोहचवले. तत्काळ रुग्णसेवेसाठी 108 रुग्णवाहिकेची ओळख आहे. तातडीच्या सेवेसाठी 108 रुग्णवाहिका धावत येते व रूग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहचवत असते . कोरोनाच्या काळातही 108 रुग्णवाहिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे. कोरोना काळात रुग्णांना कोविड केअर सेंटर पर्यन्त पोहचवण्याची महत्वाची जबाबदारी जिल्ह्यात शासनाच्या 108 रुग्णवाहिकेला सोपवली गेली होती. नऊ महिन्यात जिल्ह्यात 12403 कोरोंना बधितांना तर 6300 कोरोंना नसलेल्या रुग्णांना सेवा देत त्यांना जीवनदान दिले. जिल्हयाभरात 2 प्रकारच्या रुग्णवाहिका आहेत. त्यात बेसिक लाइफ सपोर्ट आणि ऍडव्हान्स अशे रुग्णवाहिकेचे प्रकार आहेत. जिल्हाभारत 35 रुग्णवाहिका कार्यरत आहे त्यात 9 ऍडव्हान्स लाइफ सपोर्ट व 26 बेसिक लाइफ सपोर्ट प्रकारातील आहेत. या एकूण 35 रुग्णवाहिका असून त्या पैकी पूर्वी 9 (एकूण रुग्णवाहिकेंपैकी 25% रुग्णवाहिका कोरोंनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या व इतर रुग्णवाहिका प्रसूती, सर्पदंश, अपघात, विषप्राशन केलेल्या रूग्णांच्या तातडीच्या सेवेसाठी तैनात होत्या.) नंतर 14 व नंतर रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्ण 35 रुग्णवाहिका या कोविड व कोविड नसलेल्या रुग्णांना अशा दोन्ही रुग्णांना रुग्णवाहिका सॅनिटाइज करून वापरली जात आहे . फेब्रुवारी अखेरपासून कोरोंनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती . आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विनाशुल्क 108 या टोल फ्री क्रमांकाद्वारे रुग्णवाहिका सेवा 2014 पासून सुरू करण्यात आली. या रुग्णवाहिकेत सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांसाह डॉक्टर देखील नियुक्त आहे.
कोरोना काळात रुग्णांना ने-आण करताना ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये जळगाव जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकेचे 5 चालक व 4 डॉक्टर व एक सुपरवाईजर यांना कोरोंनाची बाधा झाली . त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आल्याने सर्वजण कोरोना मुक्त झाले.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा
प्रत्येक रुग्णवाहिकेत चालकासह एक डॉक्टर कर्तव्यावर असतो. कोरोंना काळात या रुग्णवाहिकांवर अतिरिक्त तान निर्माण झाला. मात्र रुग्णवाहिकांच्या चालकांनी न थकता न हार मानता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत आपले कर्तव्य चोखपणे बजावले. 60 डॉक्टर त्यांना 72 रुग्णवाहिका चालकांनी कोरोना काळात आपले कर्तव्य चोख बजावले

कोरोना काळात ज्या रुग्णवाहिका कोविड साठी धावत आहे त्या रुग्णवाहिकांवरील डॉक्टर चालकांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटाइजर, हॅन्डग्लोव्ह्ज, सोडियम हायपोक्लोराइड 1% , हॅन्डवॉश, फेसशील्ड, शू-कवर, हेडकॅप आदि साधने मुबलक प्रमाणात बीव्हीजी कंपनी तर्फे तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या तर्फे सुदधा पुरवली गेली. तसेच रूग्णाला कोविड सेंटर पर्यन्त पोहचविल्यानंतर संपूर्ण रुग्णवाहिका sanitize केली जात होती.

अनुभव खूपच वेगळा राहिला , डॉक्टर आणी चालक हेच रुग्णांचे नातेवाईक बनले होते. लॉकडाउन मध्ये वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे बरे झालेल्या कोरोना मुक्त 1300 रुग्णांना घरपोच सेवा दिली. चालकांचे व डॉक्टर यांनी रुग्णांचे समुपदेशन केले . यासोबतच चालकांना रुग्णवाहिका सॅनिटाइजेशन चेही प्रशिक्षण दिले. चालक व डॉक्टर यांच्या प्रयत्नांमुळे अत्यवस्थ रुग्णांचे जीव वाचवण्यात 108 रुग्णवाहिकेंची सम्पुर्ण टीम पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाले. बाधित रूग्णाला पूर्ण दक्षता घेत रुग्णालयापर्यंत आणून सोडत पुन्हा दुसर्याी रुग्णांना घेण्यासाठी (गाडी सॅनिटाइज करून) 108 रुग्णवाहिका धावत राहिल्या आहेत. अशी मााहिती 108  जळगाव जिल्हा व्यवस्थापक,(BVG) डॉ. राहुल जैन यांनी आरोग्यदूत न्यूज चॅनेलला माहिती दिली.