पाचोरा येथे अनिमियमुक्त भारत अभियानाचे उद्घाटन….

0
353

 

नरसिंग भुरे. ( पाचोरा )

दिनांक १२-१२-२०२०

रोजी सकाळी ११ वाजता अनिमियमुक्त भारत या अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजय गोहिल व दादाभाऊ चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांनी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब मंत्रालयाने सुरू केलेल्या या अभियानाचे महत्व व उद्देश समजवून सांगितले. तर डॉ सुनिल गवळी यांनी अभियान कशा प्रकारे राबवावे जेणे करून अपेक्षित रुग्ण कमी होतील या बाबत मार्गदर्शन केले.

या अंतर्गत वयानुसार ६ महिन्यान पासून तर ४९ वर्षांपर्यंत असून ४ ग्रुप केले आहे. तसेच गर्भिणी माता तसेच स्तनपान करणाऱ्या माता यांचाही समावेश असून जनतेने सहकार्य करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्व ANM व आशा सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक दीक्षित आकाश ठाकूर व शिवाजी चौधरी यांचे सहकार्य लाभले..!