नरसिंग भुरे. ( पाचोरा )
दिनांक- १२/१२/२०२०
आज सायंकाळी लोहारी जवळील इंदिरानगर जवळ बस क्रमांक एमएच ४० वाय ५१९५ जामनेर ते मालेगाव व बस क्रमांक एमएच २० बीएल ३४७३ सुरत ते जामनेर जाणाऱ्या जामनेर आगाराच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याने बस वाहक, चालक व काही प्रवासी जखमी झाल्ये आहेत.
हा अपघात होताच इंदिरानगर व लोहारीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दवाखान्यात पाठवण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तसेच खाजगी वाहने आणून त्यांना उपचारासाठी पाचोरा ग्रामीणरुग्णालय व काही खासगी रुग्णालया मध्ये पाठवले आहेत.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असणारे जखमी प्रवासी व बस चालक, वाहक यांचे नाव खालील प्रमाणे..
एमएच 20 बीएल ३४७३ वाहन चालक – सोपान श्रीराम थाठे ( केकत निंभोरा, ता जामनेर )
कंडक्टर – मनोहर काशीनाथ चौधरी( जामनेर )
प्रवासी – यशवंत धर्मा निकम ( चाळीसगाव ), संध्या दयाराम वागेकर ( जामनेर ), गुरुदास नाना महाजन ( सुनजगाव, जामनेर ), संजीव रामचंद्र ठाकरे ( जामनेर )
अपघात झाल्याचे माहीत पडताच पाचोरा १०८ रुग्णवाहिका डॉ कासार , पायलट मनोज पाटील, तसेच खाजगी रुग्णवाहिका यांनी जखमींना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पाचोरा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित सांळुखे, डॉ पंकज काशीनाथ नानकर ( आयुष वैद्यकीय ), डॉ इम्रान शेख ( युनानी ) नीता राठोड, ( सिस्टर ) दुर्गा राठोड ( सिस्टर ) व अर्जुन युवराज पाटील , अमोल अशोक मापारे , शोभाबाई जाधव , शैलेश बागूल , किशोर लोहार , वाय डी पाटील या सर्वांचा योग्यवेळी मदतीचा हात लाभला.