शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने आज दि.१४ डिसेंबर रोजी १२वा. भडगांव तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले .

0
381
  1. भडगांव: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांच्या निषेधार्थ भडगांव तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने जोरदार धरणे आंदोलन आज दि.१४ डिसें रोजी भडगांव तहसील कार्यालया समोर करण्यात आले
    ……………याबाबत आधिक माहिती अशी कि,दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहे पेट्रोल ने तर नव्वदी पार केली आहे या दरवाढी मुळे सर्व सामान्य जनमानसाच्या जिवनावर विपरित परिणाम होत आहेत .दुसरीकडे महागाई वाढतच आहे इंधन दरवाढीमुळे आजून महागाइ वाढीत आजुन भरच पडत आहे या प्रकाराकडे केंद्र शासन पध्दतशीरपणे दुर्लक्ष करीत
  2. आहे.म्हणून केंद्र शासनाच्या विरोधात जण आक्रोश तयार झाला आहे हा जणआक्रोश केंद्र शासना प्रर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने भडगांव तालुका शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने आज दि.१४ डिसेंबर रोजी १२वा. भडगांव तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले .या प्रसंगी केंद्र शासना विरुध्द जोरदार घोषणा मुळे तहसील कार्यालय आवार दणानुन गेला होता…..या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी ,तालुका प्रमुख डाॕ.विलास पाटील,अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख ईम्रानअलि सैय्यद,शहर प्रमुख योगेश गंजे,जे.के.पाटील,डाॕ.प्रमोद पाटील,जि.प.सदस्य संजय पाटील,महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सिमाताई पाटील,शहर प्रमुख पुष्पाताई परदेशी,सुशीलाबाई पाटील,युवासेनेचे लखिचंद पाटील,रविंद्र पाटील,निलेश पाटील,मा.नगरअध्यक्ष शशीकांत येवले नगरसेवक जग्गु भोई,संतोष महाजन,देवाजी आहिरे,सुभाष ठाकरे,आसिमभाई मिर्झा,बन्याभाई,बापुराव पाटील,शे.शकिल शे.बाबू,फिरोजखान पठाण,प्रदिप महाजन,शब्बीरबेग मिर्झा, शे.कदिर,नागेश वाघ,डाॕ.विलासराव पाटील,आत्माराम महाजन व शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थित होते.