भडगाव तालुक्यातील वडगाव सतिचे येथे काकानेच पुतण्याचा कौटुंबिक वादातून केला खुन हे

0
322

भडगाव तालुक्यातील वडगाव सतिचे येथे कौटुंबिक वादातून तिनवर्षीय पुतण्याचा काकानेच केला खुन भडगाव तालुक्यातील वडगाव सतिचे येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या काकानेच पुतण्याला विहीरीत फेकून जिवे मारल्याची घटना घडली असून भडगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


या बाबत सविस्तर असे की, वडगाव सतीचे ता. भडगाव येथील दिपक रामदास गायकवाड, पत्नी सौ.कांताबाई व आई सिंधुताई हे कुटुंब एकत्र रहातात. व मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. दि. १४ डिसेंबर सोमवाररोजी दिपक हा दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास गावाजवळील शाळेलगत असलेल्या तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता.तेव्हा पत्नी कांताबाई घरिच होती व आयुष (वय – ३) वर्षै हा अंगणात खेळत होता. दिपक सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास मासेमारी करुन घरी परत आल्यावर त्याला आयुष घरी दिसून आला नाही. त्याने त्याची पत्नी कांताबाई हिला आयुष कोठे आहे असे विचारले असता तो अंगणात खेळत असेल असे कांताबाईने सांगितले म्हणून रामदास हा आयुषला पाहण्यासाठी अंगणात आला परंतु आयुष अंगणात नसल्याने त्याने त्याची जवळपास शोधाशोध सुरु केली. परंतु तरिही आयुष सापडला नाही. म्हणून त्याने त्याचे मित्र अंकुश दौलत पाटील, ललित जयसिंग पाटील, दत्तु नारायण ठाकरे यांना सोबत घेऊन आसपासचा परिसर पिंजून काढला मात्र आयुष सापडला नाही. यावरून आपल्या मुलाला कुणीतरी पळवून नेले असावे असा संशय मनात आल्याने त्याने भडगाव पोलीस स्टेशन गाठत आयुष हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार भडगाव पोलिसांनी मुलाचा फोटो व वर्णन घेऊन ३६३ प्रमाणे फिर्याद दाखल करुन घेत, पोलीस निरीक्षक ऊत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. भगवान बडगुजर, लक्षण पाटील, गिते व ईश्वर पाटील यांनी आयुषची शोधमोहीम सुरु केली.
हे करित असतांनाच आयुष हा त्याचा काका निलेश रामदास गायकवाड याच्या सोबत होता.अशी माहिती मिळाल्यानंतर संबधित पोलिसांनी निलेश गायकवाड यास ताब्यात घेतले व विचारपूस सुरु केली अगोदर निलेशने उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेत तर कधी पोलिसी भाषेत विचारपूस केल्यानंतर निलेशने कबुली देत ज्या विहिरीत आयुष याला टाकले होते. ती विहीर दाखवली पोलिसांनी विहिरीत पाहिले असता त्या विहिरीत आयुष हा अवस्थेत आढळून आला म्हणून भडगाव पोलीसांनी गुन्हा नोंदवून निलेश यास तात्काळ अटक करून ताब्यात घेतले आहे.
कमी वेळात घटनेचा तपास लाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.