पाचोरा, जागतिक एड्स दिनानिमित्त शिबीर संपन्न

0
291
  1. जागतिक एड्स दिनानिमित्त शिबीर संपन्न
    पाचोरा -जागतिक एड्स दिनानिमित्त शिबीर आयोजित करण्यात आले होते.
    पंधरवडा निमित्ताने आज आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय पाचोरा व शहर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर पाचोरा येथे एचआयव्ही एड्स, गुप्तरोग, COVID-19 बाबत माहिती सांगण्यात आली तसेच एचआयव्ही एड्स बाबत IEC माहिती पत्रक वाटण्यात आले. ३७ लाभार्थ्यांची एचआयव्ही टेस्टिंग करण्यात आली. सदर कार्यक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे व. शहर प्राथमिक आरोग्य केंद्राचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला , आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत भोई व समुपदेशक व मार्गदर्शन श्रीमती छाया मोरे यांनी केले.
    श्रीमती भारती सोळुंके आरोग्य सेविका यांनी गरोदर स्त्रिया व बालकांचे लसीकरण बाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका श्रीमती भारती सोळुंके, आशा वर्कर श्रीमती प्रतिभा पाटिल यानी परिश्रम घेतले.