आत्मदहन करण्यापूर्वीच भारती कोकने हिस पोलिसांनी घेतले ताब्यात

0
602

आत्मदहन करण्यापूर्वीच भारती कोकने हिस पोलिसांनी घेतले ताब्यात
पाचोरा, प्रतिनिधी !
बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथील विनोद रमेश कोकने यांचा वरखेडी रोडवरील क्वाॅरटांईन सेंटर मध्ये २० जुलै २०२० रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता. विनोद कोकने यांनी आत्महत्या केली नसुन त्यांच घातपात झाला आहे. असा आरोप त्याची पत्नी भारती विनोद कोकने हिने दि. १५ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. गेल्या पाच महिन्यांपासून न्याय मिळत नसल्याने भारती कोकने हिने दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या पाच वर्षाची मुलगी व दोन वर्षाच्या मुलासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पाचोरा पोलिस स्टेशनचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅण्ड व भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात तैनात करण्यात आले होते. अखेर भारती कोकने, दोन मुले व आई भडगाव कडुन अॅटो रिक्षात येत असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, काॅन्स्टेबल, किशोर पाटील, सुनिल पाटील, किरण पाटील, निलेश गायकवाड व महिला पोलिस कर्मचारी शारदा भावसार यांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथील विनोद कोकने या दि. १९ जुलै रोजी कोरोनाची लक्षणे आढळुन आल्याने तो स्वत:हुन चाचणी करुन घेण्यासाठी वरखेडी रोडवरील साईमोक्ष मंगल कार्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. यावेळी विनोद याचे स्वॅब घेण्यात आले. कोरोनाचा अहवाल येण्याअगोदरच दि. २० जुलै २०२० रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान विनोद कोकने याचा मृतदेह कोविड सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चॅनलगेटला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. भारती कोकने यांनी पतीने कोरोना व्हायरसचा उपचार हा खाजगी रुग्णालयात करण्यासाठी माझ्या चाळीसगाव येथील माहेरहुन ४० हजार रुपये आणले होते. ते पैसे माझे पती विनोद कोकने यांच्याकडे होते. मात्र मृतदेहाजवळ सदरचे ४० हजार रुपये आढळून न आल्याने त्यांची आत्महत्या नसुन पैशांसाठी हत्या झालेली असतांना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. व आम्हास न्याय मिळाला नाही. त्यामुळे भारती कोकने हिने दोन लहान मुलांसह आज सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने पोलिसांना सकाळ पासुनच कसरत करावी लागली. भारती कोकने ही चाळीसगावहुन बसने येणार असल्याचे तिने अनेकांना बतावणी केली. पोलिस महाराणा प्रताप चौक, बस स्टॅण्ड येथे उभे राहुन चाळीसगाव कडुन येणारी प्रत्येक बस तपासत होते. मात्र भारती, एक मुलगा, एक मुलगी व आई हे महाराणा प्रताप चौकाच्या अगोदर कैला देवी मंदिराजवळ उतरुन तेथुन अॅटो रिक्षाने प्रवास केला. दरम्यान पोलिसांकडे तिचा फोटो असल्याने पोलिस बस सोबतच भडगाव कडुन येणारी प्रत्येक रिक्षा तपासणी करत होते. अखेर ती एका रिक्षात आढळुन आल्याने पोलिसांनी तिला रिक्षातुन उतरवुन शासकीय वाहनातुन पोलिस ठाण्यात आणले. तसेच त्यांचे जवळील एक राॅकेलची बाटली व आत्मदहनाचा उल्लेख असलेले बॅनर पोलिसांनी जप्त केले. व सदर प्रकरणाची चौकशी करुन यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगुन भारती कोकने, दोन मुले व आई यांना शासकीय वाहनातुन त्यांचे घरी सोडण्यात आले आहे.

पोलिस उपअधीक्षकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता
भारती कोकने ही येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी ११ वाजता आत्मदहन करणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजेपासून पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार हंसराज मोरे, राहुल बेहरे, गजानन काळे, नंदकुमार जगताप, ज्योती बोरसे, यांचेसह पोलिस कर्मचारी व होमगार्ड सकाळी ९ वाजेपासूनच तैनात होते. अखेर भारती कोकने हिस महाराणा प्रताप चौकातुन ताब्यात घेतल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.