हाती आलेले सोडत, भुरट्याचोर पसार.

0
383

पाचोरा, (नरसिंग भुरे) :- दि.१७ रोजी पहाटे १ तेे २ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या देशमुख वाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी आय.डी.बी.आय बँकेच्या शाखेच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला,

सदर एटीएममध्ये इसमाने प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे ची वायर तोडून काच फोडून नुकसान करून एटीएम मशीन हॉल्ट वाकवून रोकड चोरण्याच्या उद्देशाने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न भुरट्या चोरांनी केला पण तसे करण्यात तो असफल ठरला, सदर प्रकार सकाळी बँक उघडल्यांनातर एटीएम मशीन साफ सफाई करणारा कर्मचारी रवींद्र युवराज पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ बँकेचे असिस्टंट मॅनेजर विनायक मामुलकर व सारंग श्रीराम हिंगणे यांना फोनद्वारे कळविले, त्याअंती एटीएम ची पाहणी केली असता पैसे जशास तसे आढळले, पैस्यांची चोरी करणे फोल ठरले, व चोर एटीएम सोडून पसार झाल्याचे दिसून आले, याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला कळविण्यात येऊन याबाबत सविस्तर तक्रारीची नोंद पोलीसांकडून करण्यात आली,

फिर्यादी बँकेचे व्यवस्थापक सुधानशू कुमार सुदर्शन प्रसाद (रा.बोकारो झारखंड, हल्ली मुक्काम पाचोरा) यांनी पाचोरा पोलीस स्टेशन ला दिली, अज्ञात चोरट्यांविरुद्ध भाग ५, कलम ३७९,५११,४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील  तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी व मुकुंद परदेशी करित आहे, या घटनेने पाचोरा शहरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेे.