Sunday, October 1, 2023
Home ताज्या घडामोडी फसवणूक करणाऱ्या तरूणाला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केली अटक.

फसवणूक करणाऱ्या तरूणाला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केली अटक.

0
263

कमी किंमतीत वस्तू देण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक करणाऱ्या तरूणाला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केली अटक.

दिनांक~२१/१२/२०२०

आजकालच्या धावपळीच्या युगात जो तो कमी कालावधीत व कमी श्रमात आपल्याला फायदा कसा होईल हे शोधत असतो व अश्यांचाच शोध घेऊन त्यांना गंडा घालून लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल या संधीची वाट पहाणारे ही असतातच

म्हणूनच लालच का फल बुरा होता है, असे म्हणतात मग तो देणारा असो की घेणारा
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यात घडला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कमी किंमतीत वस्तु घेऊन देण्याचे आमिष दाखवुन जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नासिक येथील एका ठगाने अनेकांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच कुऱ्हाड येथील पवन प्रताबराव पाटील. व गावातील एका पिडीताच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरे.) पोलिसात आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुऱ्हाड ता. पाचोरा येथील पवन प्रताबराव पाटील. या तरुणास भारत तुळशीराम मालकर (वय – ३३) ह. मु. जानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक या इसमाने गावातीलच पवन प्रतापराव पाटील (वय – ३७) यांचेकडुन कमी किमतीत नविन जे.सी.बी. घेवुन देतो, नविन जे.सी. बी. ची किंमत ३० लाख रुपये आहे. पण मी तुला २५ लाख रुपयात जे.सी.बी. घेवुन देतो, तु मला रोख २५ लाख रुपये दे अशी खोटी बतावणी करुन माझेकडुन सप्टेंबर – २०१९ नियमित असे २५ लाख रुपये घेवुन फसवणुक केली आहे. यासोबतच शिवप्रसाद अशोक पाटील यांची (५ लाख ५० हजार रुपये), आरीफ शेख सुलतान यांची (५ लाख ६ हजार रुपये), प्रदीप एकनाथ महाजन यांचे (४ लाख १२ हजार ५००रुपये), प्रविण एकनाथ महाजन यांचे (१ लाख ५० हजार रुपये), दिपक विष्णु तेली यांचे (७ लाख रुपये), संदीप विष्णु ढाकरे यांचे ३ लाख ३५ हजार रुपये) असे एकुण ५१ लाख ५३ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याने पवन पाटील यांचे फिर्यादीवरून भारत तुळशीराम मालकर याचे विरुद्ध पिंपळगाव (हरे.) पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून भारत मालकर यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अजुन काही व्यक्तींची फसवणुक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रसिंग गुलाबसिंग पाटील, पो. हे. कॉ. रणजीत पाटील, पोलिस नाईक रविंद्रसिंग पाटील, शिवनारायण देशमुख, अरुण राजपुत, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी सरोदे, संदीप राजपुत हे करीत आहे.