अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0
263

नरसिंग भुरे (पाचोरा)

बाळद येथील इसमास मारहाण करुन ३ लाख २९ हजाराचा मुद्देमाल लुटला
– अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

टाटा इंडिका कारला कट मारुन देवुन जाणाऱ्या मालवाहु रिक्षास थांबवुन जाब विचारला असता त्याचा राग येवुन कार चि
चालकास मारहाण करत त्यांचे जवळील रोख रक्कमेसह ३ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवुन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना घडली असुन घटनेबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महेश शिवाजी सोमवंशी (वय – ४७) रा. बाळद बु” ता. पाचोरा ह. मु. मयुर काॅलनी, खोटे नगर, जळगांव हे दि. २० रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास टाटा इंडिका कार (क्रं. एम. एच. १९ ए. पु. १८३७) ने पाचोरा हुन जळगांव जात असतांना बिल्दी फाट्याजवळ मागुन येणाऱ्या टाटा मॅजिक (क्रं. एम. एच. १९ बी. यु. १६०९) कट मारताच कारचा साईड ग्लास फुटला व काचाचे तुकडे हे महेश सोमवंशी यांचे चेहऱ्यावर लागले. महेश सोमवंशी यांनी टाटा मॅजिक ला थांबवुन जाब विचारला असता त्याचा राग येवुन महेश सोमवंशी यांना टणक वस्तुने मारहान करत त्यांचे जवळील २ लाख ३ हजार रुपये रोख, १ लाख २० हजार रुपये किंमतीची तीन तोळ्याची सोन्याची चैन व ६ हजार रुपये किंमतीचा ऐम. आय. कंपनीचा मोबाईल फोन हिसकावुन अज्ञात चोरटा तेथुन फरार झाला. घटनेबाबत महेश सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध लुटमारी गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे हे करीत आहे.