ईडीच्या चौकशीसाठी मदत करणार आहे – एकनाथराव खडसे.

0
220
  1. नरसिंग भुरे.(पाचोरा)
    दिनांक~२६/१२/२०२०
    भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी ईडी ने नोटीस बजावली असून येत्या ३० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे सांगण्यात आले असून ईडीच्या चौकशीला मदत करेल यापूर्वी देखील पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, झोटिंग समिती व इतर चौकशी एजन्सींना चौकशी करिता मदत केली असून यावेळीही ईडी चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज जळगाव येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
    खडसेंना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी यापूर्वीच पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, क्लीन चिट दिली आहे. या निर्णयामुळे एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला होता.भोसरीतील भूखंड खरेदी करतांना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही.शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडाला नाही, असं एसीबीने अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज अचानक याप्रकरणी ईडी ने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करते वेळी खडसे यांनी म्हटलं होतं की माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावीन.. आता खडसेंच्या मागे ईडी तर लागली मात्र खडसे कोणती सीडी लावता या बाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.