भाग्यलक्ष्मी आगेच्या विळख्यात

0
414

एन एस भुरे (पाचोरा)

दि.३१/१२/२०२०

शहरातील भाग्यलक्ष्मी हाॅटेलला आग सुदैवाने जीवितहानी टळली

शहरातमध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशिल मराठे यांच्या मालकीच्या भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटला आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शाॅर्टसक्रीटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हाॅटेलच्या प्रवेशद्वारा जवळच असलेले किचन जळुन खाक झाले असुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांचे सहकार्यांना सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न करत तात्काळ न. पा. अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे, आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांना आग विझविण्यात यश आले. सदरची घटना पहाटे घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली व किचन मध्ये असलेले गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. घटनास्थळी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणून घेतली.