मोटरसायकलची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू

0
407

प्रतिनिधी (पाचोराा)

सारोळा बु” ता. पाचोरा येथील जगन्नाथ त्र्यंबक हवाळे (वय – ७३) हे गुरुवारी रात्री ७:३० वाजेच्या दरम्यान पाचोऱ्याहुन घरी जात असतांना मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने डोक्याला जबरी मार लागल्याने पाचोरा येथे उपचारासाठी आणत असतांनाच रस्त्यात त्यांची प्राण ज्योत मालवली. सारोळा बु” ता. पाचोरा येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ त्र्यंबक हवाळे हे मोटरसायकलवर घरी जात असतांना कृष्णापुरी, पाचोरा येथील सुरेश नेरपगार मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने नेरपगार हा जखमी झाला तर जगन्नाथ हवाळे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पाश्र्चात्य पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना,‌ नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर दि. १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे