पाचोऱ्यातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत श्रीनिवास क्लब संघ विजेता

0
481

पाचोरा  प्रतिनिधी,
पाचोरा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत श्रीनिवास संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजेता संघास मान्यवरांच्या हस्ते ट्राॅफी व रोख रक्कम देवुन गौरविण्यात आले.
पाचोरा शहरातील छत्रपती गृपचे सॅन्डी पाटील, योगेश शेळके व मयुर पारोचे यांच्या संकल्पनेतून दि. १ जानेवारी २०२१ पासुन येथील एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेता संघास आमदार किशोर पाटील यांचे तर्फे ३१ हजार रुपये तर उपविजेता संघास भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे तर्फे २१ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. सदर स्पर्धेत शहरातील एन. एस. इलेव्हन संघ, तुळजाई स्ट्राईकर्स संघ, एन. के. पॅन्थर्स संघ, टीम दबंग संघ, आशिर्वाद इन्र्फा संघ, युवासेना टाइगर्स संघ, आदी डिजीटल संघ व श्रीनिवास क्लब संघ असे आठ संघांनी सहभाग घेतला होता. दि. ३ रविवार रोजी झालेला अंतिम सामना हा श्रीनिवास क्लब संघ व आदी डिजीटल संघात रंगला. यात श्रीनिवास क्लब संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ८ शटकात आदी डिजीटल संघा समोर ७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु श्रीनिवास क्लब संघाच्या भेदक गोलंदाजी समोर आदी डिजीटल संघ हा ५४ धावा करु शकला. यामुळे या सामन्यात श्रीनिवास क्लब संघाने विजेतेपद पटकावले. तर आदी डिजीटल संघास द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. यावेळी पारितोषिक वितरणा प्रसंगी सुमित किशोर पाटील, मालोजीराव भोसले, दिशा डेंन्टल क्लिनीकचे डॉ. अमोल जाधव, सुदन हाॅस्पीटलचे डॉ. प्रशांत पाटील, श्रीनिवास डॉ. नरेश गवांदे सह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत मालिकाविर म्हणुन आदी डिजीटल संघाचा योगेश शेळके तर सामनाविर म्हणुन आदी डिजीटल संघाचाच सनी राठोड यांना त्यांच्या उत्कृष्ट खेळाबद्दल पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी दिपक (आबा) पाटील यांनी सुत्रसंचलन केले. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी छत्रपती गृपचे सॅन्डी पाटील, योगेश शेळके व मयुर पारोचे यांनी अथक परिश्रम घेतले.