विविध क्षेत्रातील महीला भगिनींनी कोरोना काळात आपन आपल्या जिवाची पर्वा न करत आपल्या आदर्शवत कार्यास मराठ सेवा संघ सलाम करुन आपणास कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आल

0
210

भारतातील पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्रि शिक्षणाची प्रणेत्या, विद्याची जननी व समस्त स्त्रियांना अंधारातून उजेडाची वाट दाखविणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता-राजमाता-माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ पाचोरा व जगतगुरु संत तुकाराम महाराज उत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील पांचाळेश्रर नगरातील मिठाबाई कन्या शाळेत दिनांक 6 जानेवारी 2021 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता पाचोरा शहरातील विविध क्षेत्रातील दिग्गज /करोना योद्धा महिला भगिनींचा सन्मान करण्यात येऊन साजरा करण्याचा आदर्श पायंडा यावर्षी पासुन उत्सव समिती व मराठा सेवा संघ यांनी घालून दिला या प्रसंगी रविंद्र पाटील सेवा निवृत्त फौजी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक हरी पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, एस् के आण्णा पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र सुकदेव पाटील ,रवींद्र चंदीले(उद्योजक),रविंद्र भिमराव पाटील, आर बी चव्हाण सर, यांच्यासह सन्मानार्थी प्रा मंगला शिंदे (सामाजिकक्षेत्रात),फरीदाबी खान (सरकारी रुग्णालय),योगिता पाटील (एस.टीमहामंडळ),भारती बागड(आदर्श शिक्षक)रेखा साळुंखे (तहसील) यांना सन्मान चिन्ह व पुप्षहार देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत पोवाडा-गीत शाहीर महाजनांनी सादर केले तर मंगला शिंदे व भारती बागड यांनी उपस्थित विद्यार्थीनीनां माँसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत रहस्यमय आणि प्रबोधनात्मक विचार मांडले तर सुर्यवंशी मॅडम यांनी आभार मानले युवा नेते संदिप राजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले