गोंदेगाव येथे नारळ फोडून लोकशाही विकास पॅनलच्या प्रचारास शुभारंभ .

0
728

दि.6/1/2021
गोंदेगाव प्रतीनिधी,श्री.तात्या नगरे

सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आजी माजी सदस्य व सरपंच यांनी दि. 6/1/2021रोजी प्रचार चालू केले आहे. गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील लोकशाही विकास पॅनलचे श्रीराम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे . त्यावेळी तेथे शरद निकम, गौरव बिदवाल, प्रशांत चौधरी, रविंद्र निकम, आबा बोरसे, शेनपडु साळवे, अतुल बोरसे, राजेंद्र बोरसे, अण्णा सोनवणे, शरद नाना महालपुरे, किसन सेठ बिदवाल, दिलीप सेठ दिलवाल असे दोनशे ते अडीचशे लोक उपस्थित होते. गोंदेगाव येथील श्रीराम मंदिरावर नारळ फोडून प्रचारास सुरूवात करण्यात आली. दि.6/1/2021 पासून लोकशाही विकास पॅनलचा प्रचार सुरू करण्यात आलेला आहे. सात महिला व सहा पुरुष असे पॅनल तयार झालेले आहे. सर्व उमेदवारांनी आम्ही गावाचा विकास ,महिलांची सुरक्षा व गावातील अतिक्रमण दूर करण्यात येईल असे आश्‍वासन दिले.