पाचोऱ्यात विवाहितेने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.

0
456

पाचोरा प्रतिनिधी, पूजा येवले

     पाचोरा शहरातील देशमुखवाडी परिसरातील रहिवासी अनिल पाटील यांच्या पत्नी सुनंदा अनिल पाटील (वय – ३२) यांनी दि.9/1/2021 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या छताला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली.दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसल्याने घरच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटने प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेचे माम सासरे विजय अभिमन्यू पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी संगिता हिस तात्काळ रुग्णालयात दाखल केले. येथील ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. मयत संगिता अनिल पाटील यांनी आत्महत्या करन्यामागचे कारण अजुनही समजु शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.