मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुक धारकांच्या परताव्याबाबत मंत्रालयात मंगळवारी बैठक

0
438

पाचोरा प्रतिनिधी, पूजा येवले
राज्यातील बहुतांशी नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुक केली आहे. मैत्रेय कंपनीने कोणत्याही स्वरुपाचा परतावा गुंतवणूक धारकांना केला नसल्याने या संदर्भात पाचोरा – भडगाव तालुका संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मागील वर्षी कोरोना असल्याने हा विषय प्रलंबित करण्यात आला होता. या विषया संदर्भात दि. १२ जानेवारी रोजी मंगळवारी दुपारी १ वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणुक धारकांना योग्य तो कायद्यानुसार परतावा मिळावा यासाठी मंगळवार मंत्रालयात गृहराज्यमंत्री (ग्रामिण) शंभुराजे देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. असून याबैठकीस पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, अ. मु. स. गृह विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त (मुंबई), यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.