नविन पोलिस निवासस्थान व कार्यालय उभारणीसाठी मंत्रालयात मंगळवारी बैठक

0
498
पाचोरा प्रतिनिधी, पूजा येवले
राज्यातील विविध पोलिस निवासस्थान व कार्यालयांचे नविन बांधकामा संदर्भात दि. १२ जानेवारी २०२१ रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता राज्याचे गृहमंत्री (ग्रामिण) शंभुराजे देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीत राज्यमंत्री बच्चु कडु, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिल बाबर (सांगली), आमदार किशोर पाटील (पाचोरा – भडगाव), आमदार प्रा. रमेश बोरनारे, पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ, मुंबई), अप्पर पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय, मुंबई), मुंबई गृह विभागाचे उपसचिव, विशेष पोलिस महासंचालक (कोल्हापूर), अमरावती, औरंगाबाद, कोकण सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पाचोरा – भडगाव शहरातील पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या जुन्या निवासस्थानांच्या जागी नविन निवासस्थाने व नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याकरिता मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी नियमित पाठपुरावा करून या बैठकीत सदरचा विषय मार्गी लावला जाणार आहे.