नांदगाव तांडा येथील आरोग्य उपकेंद्र शो- पीस.

0
675

आरोग्यदूत न्यूज प्रतिनिधी, पूजा येवले

बनोटी PHC अंतर्गत असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नांदगाव मधील आरोग्य ईमारत दिमाखात उभी आहे. जवळ – जवळ लाखोंचा खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आलेले असताना साधारण एका वर्षापासून ही ईमारत व यामधील सर्वच साहित्य धूळ खात पडलेले आहे. बड्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याचवेळी जनतेच्या उत्तम आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्यदूत नुज चॅनल ची नजर यावर पडली जनतेच्या सेवेसाठी हे आरोग्य प्राथमिक उपकेंद्र तत्काळ सुरू होणे गरजेचे असल्याने मुख्य. संपादक. श्री नरसिंग भुरे यांनी या प्राथमिक उपकेंद्र सबंधित डॉक्टर अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर केंद्र तत्काळ सुरू करण्याबाबत ची कार्यवाही सुरू करावी अशी मागणी केली, अधिकाऱ्यांनीही लवकरच केंद्र सुरू होईल याबाबत भुरे साहेबांना आश्वासन दिले.