घरात घुसून तरूणीचा विनयभंग केल्याचे प्रकार उघडकीस आला ; तरूणावर गुन्हा दाखल.

0
341

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरूणीव घरात एकटी असतांना गावातील एकाने घरात घुसून तरूणीचा विनयभंग केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव हरेश्वर येथे एकावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिंदाड येथे १९ वर्षीय तरूणी १२ जानेवारी रोजी घरी सायंकाळी ७ वाजता घरात कोणीही नसतांना संशयित आरोपी गजानन माणिक पाटील रा. शिंदाड ता. पाचोरा याने दारूच्या नशेत घरात घुसन पिडीतेचा उजवा हात पकडून अलिंगण दिल्याने मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गजानन पाटील यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.विजय माळी करीत आहे.