एन एस भु (पाचोरा )
3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व 12 जानेवारी माॅसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सप्ताहा सोहळा संभाजी नगर पाचोरा यथे साजरा करण्यात आलाः
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती पाचोरा,तसेच पाचोरा कोळी समाज,व माळी समाज,गुजर समाज,छत्रपती शिवाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने,राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव,दि.12 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री.दिपक भावराव शेवरे, यांच्या निवासस्थानी जन्मउत्सव साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.मिनाताई दिपक शेवरे शहर उपाध्यक्षा कोळी समाज महिला मंडळ पाचोरा हे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रविंद्र रा. पाटील, शाहिर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन माऊली, श्री.रविंद्र पाटील मा.सैनिक राजेंद्र एस.पाटील.जितेंद्र पाटील सर,राजु भाऊ मराठे, रमेश चत्रु वाघ हे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृता कदम यांनी जिजाऊ वंदना सादर केली, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मिनाताई दिपक शेवरे, यांचा वाढदिवस व जिजाऊ जन्मोत्सव संयुक्तीक कार्यक्रमा निमित्त जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दिपप्रज्वलन करून साजरा केला,
प्रास्ताविकःजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब अनिल मराठे यांनी केले,तर सुत्रसंचलन सचिव, विनायक राऊतराय सर यांनी केले, जिजाऊच्या जिवन चरित्र वर सचिन पाटील हर्षल सौदाणे यांनी विचार मांडले,
कार्यक्रमास सौ.सुमनबाई गुजर कल्पनाबाई गुजर ऊषाबाई महाजन आशाबाई पाटील सुषाबाई कोळी दिक्षा शेवरे साक्षी शेवरे आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार शिवश्री.दिपक भावराव शेवरे यांनी मानले