चाळीसगावच्या तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

0
758

चाळीसगावच्या तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

आरोग्यदूत प्रतिनिधी >> नाशिकहून आईस भेटण्यासाठी येत असलेला मुलगा हिरापूर रेल्वे स्थानक जवळ भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथील विश्वास उत्तमराव शितोळे ( वय ४४) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून नाशिक येथे महिंद्रा कंपनीत नोकरीला होते. ते आपल्या आईला भेटायला नाशिक येथून मोटारसायकल वर (MH-15GU-0814) येत असताना हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ एका भरधाव ट्रकने धडक दिला व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज ३:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, विधवा आई व मतीमंद भाऊ आहे.